भारत देश समृद्ध झालेला आणि गरिबीच्या शृंखलेतून देशाला मुक्त होताना आपल्याला बघायचंय, मात्र, त्याकरता काय करावं लागेल, हे आपल्याला अगदीच थोडं ठाऊक आहे.
आपल्यामध्ये आपलं प्राक्तन बदलण्याची शक्ती आहे का, ज्याद्वारे आपण भारताचं प्राक्तन बदलू शकू? या प्रश्नावर माझं उत्तर आहे- हो. हो, आपल्यात आपलं प्राक्तन बदलण्याची ताकद आहे.
एक सत्य ध्यानात घेऊन सुरुवात करूया. आपण आपल्या प्राक्तनाचे मालक आहोत. आपलं भविष्य निश्चित करण्याची ताकद आपल्यात आहे आणि आपल्या मुलांना वारसा हक्काने मिळणारे जग निर्माण करण्याची ताकदही आपल्यात आहे.
सुमारे ७० वर्षांपासून, आपण आपल्या प्राथमिक जबाबदारीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. समाज सुयोग्य बनावा, उत्पादक बनावा, काळजी घेणारा आणि समृद्ध बनावा, ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, पण आपण ती जबाबदारी पार पाडली नाही. आपल्या कर्तव्याकडे- आपल्या धर्माकडे आपण दुर्लक्ष केले.
आपण आपली जबाबदारी राजकीय पक्षांकडे सोपवतो, आपण हे याआधी केले आहे आणि मग राजकीय पक्ष आपल्या आयुष्यावरच ताबा मिळवतात. ते आपले मालक बनतात आणि आपण त्यांचे सेवक बनतो. मालक म्हणून त्यांनी आपली संपत्ती स्वत: श्रीमंत होण्याकरता वापरली आणि आपल्या स्वातंत्र्याच्या बदल्यात आपण काय मिळवलं?
या वर्षी गॅस सिलिंडर, दुसऱ्या वर्षी सौर दिवे, साडी अथवा रेशन दुकानांवर काही धान्य.
ही देवाणघेवाण फारच दयनीय स्वरूपाची होती. त्यांनी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आणि त्या बदल्यात किती कमी दिलं! त्यांनी आपल्याला गरीब बनवलं आणि नंतर त्यांनी आपल्यावरच नियंत्रण मिळवलं.
या सगळ्यात आपणच दोषी आहोत. जसं आपण ब्रिटिश राजला आपण आपलं स्वातंत्र्य गहाण टाकलं होतं, तसं आपण नव्या सरकारला गहाण टाकलं. आपण राजकीय पक्षांना आपले नवे मालक बनवले.
जर आपल्याला आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या देशाची खरोखरीच चिंता असेल, तर हा व्यापार थांबवण्याची वेळ आली आहे. क्षुद्र गोष्टींसाठी आपण जे आपले स्वातंत्र्य त्यांना बहाल केले आहे, ते परत मिळविण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलांना हा भयानक वारसा आपण पोहोचवता कामा नये.
तर मग, आपण ही समस्या कशी सोडवू शकू? आपण आपल्या आयुष्यावर, आपल्या प्राक्तनावर कसे नियंत्रण मिळवू शकू? याचे उत्तर स्पष्ट आहे. जी व्यवस्था आपल्याला बदलायची आहे, ती आपण वापरायला हवी. आपल्याकडे एक अमूल्य गोष्ट आहे, ती म्हणजे आपला मतदानाचा अधिकार. बदलाची मागणी करण्याकरता आपण आपला मतदानाचा अधिकार उपयोगात आणायला हवा.
माझा हाच प्रस्ताव आहे. आपण असे लोक निवडायला हवे, जे राजकीय पक्षांकरता नव्हे, तर आपल्याकरता काम करतील. हे कसं शक्य आहे, तर सद्य सरकारच्या गोंधळापासून मोकळं होण्याकरता जे आपल्याशी सहमत आहे, त्यांनी निवड केली तर हे शक्य आहे. असं करण्यासाठी आमचे एक व्यासपीठ आहे- आमचे धन वापसी व्यासपीठ आहे.
राजकीय पक्ष नव्हे, तर धन वापसी व्यासपीठ तुम्हाला तुमचा प्रतिनिधी निवडण्यास सक्षम करते. यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला निवडाल, ती व्यक्ती निवडणुकीचे तिकीट ज्यांच्यामुळे मिळते त्या राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना नव्हे, तर तुम्हाला उत्तरदायी राहील, जे उमेदवार राजकीय पक्षांच्या नेत्यांचं हित जपत नाहीत, तर जे आपली आवड, आपलं हित यांचं प्रतिनिधित्व करतात, आपण अशा उमेदवारांना निवडून द्यायला हवं. जे सार्वजनिक संपत्तीतील आपला वाटा आपल्याला परत करतील, अशा उमेदवारांना आपण निवडून द्यायला हवं. भारताच्या सार्वजनिक संपत्तीतील वाटा म्हणून देशातील प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये मिळायला हवे.
आगामी निवडणुकीत व्यवस्था बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. केवळ तुम्हीच तुमच्या स्वातंत्र्याचं रक्षण करू शकता. केवळ तुमच्याकडेच तुमची संपत्ती परत मागण्याची ताकद आहे. केवळ तुम्हीच धन वापसी घडवू शकता.
राजकीय पक्ष केवळ तुमचे मत आपल्या पारड्यात पडावे यासाठी प्रयत्न करतात आणि त्या बदल्यात तुम्हाला ते खूप कमी देतात. पण, तुमचे मालक तुम्ही स्वत: असाल असं जर तुम्ही ठरवलंत, तर तुमचं शोषण करणाऱ्या व्यवस्थेत तुम्ही बदल घडवून आणू शकता. तुम्हाला सेवक नव्हे, तर मालक बनवणाऱ्या क्रांतीचा भाग बना. जे राजकारण्यांशी नाही, तर आपल्याशी वचनबद्ध आहेत, अशा उमेदवारांना आपल्याला मत द्यावं लागेल.
DhanVapasi.com वर जा आणि ज्यावर तुमचा न्याय्य हक्क आहे, त्याचं नियंत्रण मिळवण्याकरता तुम्ही धन वापसी अॅपचा वापर करा. सदस्य म्हणून साइन अप करा, इतरांनाही साइन अप करण्यास सांगा आणि कदाचित, नेता बनण्याचेही निश्चित करा. जर तुम्ही नाही, तर कोण हे करणार ? आणि आता नाही, तर कधी आपण हे साध्य करणार?
जय हिंद !